साउथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते प्रकाश राज सध्या त्यांच्या अभिनयापेक्षा राजकीय वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आहेत. नुकतेच ते एका टीव्ही चॅनेलच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारविषयी आपली भूमिका माडली. प्रकाश राज यांनी म्हटले की, ‘मी हिंदूविरोधी नाही. मी केवळ मोदींचा विरोध करतो. टीकाकारांनी माझ्यावर चुकीच्या hद्धतीचे आaरोप लावले आहेत.’ एका टीव्ही चॅनेलने आयोजित केलेल्या चर्चेत त्यांनी अतिशय निर्भिडपणे हे वक्तव्य केले. यावेळी त्यांना स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले होते. कारण ते खूपच ओरडून आपले मत मांडत होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews